‘या’ म्य़ुझिशियनला डेट करतेय आमीरची मुलगी

7

सामना ऑनलाईन । मुंबई

आमीर खानची मुलगी इरा खान ही लाईम लाईटपासून कायम लांब राहते. इरा बॉलिवूडमध्ये करिअर करणार का याबाबत देखील कसलीच चर्चा अद्याप झालेली नाही. मात्र सध्या इरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. इरा ही सध्या एका मुलाला डेट करत असून तिने तिच्या प्रेमाची कबूली दिली आहे. इरा ही सध्या म्युझिशियन मिशाल क्रिपलानीला डेट करत आहे.

ira-khan-1

इंस्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये इराला एका नेटकऱ्याने ती कुणाला डेट करतेय का असा प्रश्न विचारला. त्यावर इराने त्याला उत्तर देताना तिचा व मिशालचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोत तिने मिशालला टॅगही केले आहे. याआधीही इराने मिशालसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इरा व मिशाल हे दोघे सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियात एकत्र राहत आहेत. ते दोघे कायम एकत्र फिरताना दिसतात.

आपली प्रतिक्रिया द्या