इरोम शर्मिला विवाहबंधनात अडकणार

सामना ऑनलाईन। इंफाळ
मणिपूर राज्यामध्ये सशक्त दल विशेष अधिकार कायद्याच्या विरोधात( अफस्पा) १६ वर्ष उपोषण करणारया आर्यन लेडी इरोम शर्मिला लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मार्च महिन्यात मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर डेसमंड कूटिन्हो यांच्याशी त्या विवाह करणार आहेत.अशी माहिती खुद्द इरोम शर्मिला यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
इरोम शर्मिला यांनी मणिपूरमध्ये अफस्पा कायद्या विरोधात १६ वर्ष आमरण उपोषण केले होते. पण त्याचा हवा तसा प्रभाव पडत नसल्याने चार नोव्हेंबर २००० साली सुरु केलेले उपोषण इरोम यांनी गेल्या वर्षी ९ ऑगस्टला सोडले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला असून मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाच्या त्या उमेदवार आहेत. त्यांनी प्रिजा नावाची स्वयंसेवी संस्थाही सुरु केली आहे. त्यामार्फत त्यांचे सामाजिक कार्य आजही चालू आहे.