इरफान खान मुंबईत परतला?

1

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इरफान खान याला कर्करोग झाल्याने गेले वर्षभर तो लंडनमध्ये उपचार घेत होता. मात्र आता इरफान खान हिंदुस्थानात परतला असून त्याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धिरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इरफान खान याने त्याला कर्करोग झाल्याचे त्याने गेल्या वर्षी मार्च महिन्यात जाहीर केले होते. कर्करोगामुले इरफान खानची तब्येत अत्यंत खराब झाली होती व तो खूप बारीकही झाला होता. त्याचे व्हायरल झालेले फोटो बघून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला होता.

लवकरच इरफान खान त्याचा गाजलेला चित्रपट हिंदी मीडिअमच्या सिक्वेलमधून पुनरागमन करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. येत्या काही दिवसात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून त्याआधी इरफान त्याच्या जयपूर येथील गावी जाऊन येणार असल्याचे देखील समजते.