उन्हाळ्यात अंडी खावीत का? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असं म्हटलं जातं. व्हिटामिन ए , डी बरोबरच मुबलक प्रोटीन्स असलेली अंडी तब्येतीसाठी उत्तम असली तरी ती  पचायला उष्ण असतात. यामुळे बरेच जण उन्हाळ्यात अंडी खाणं टाळतात. पण हे योग्य आहे का याबद्दल जाणून घेऊ या.

feke-eggs

अंडी म्हणजे पोषक घटकांनी भरलेलं भांडारच आहे. शरीराच्या विकासासाठी आवश्यक असलेले प्रोटीन्स, व्हिटामिन ए आणि डी यात असल्याने डॉक्टर रोज अंडी खाण्याचा सल्ला देतात. यातूनच आता मांसाहारी नसलेला पण अंडी खाणारा एग्गिटेरियन वर्ग तयार झाला आहे. अंड्यात ९० टक्के कॅल्शियम आणि आयन आहे. ज्याची शरीराला गरज आहे. यातील पांढऱ्या बलकात प्रोटीन्स असते. पण गरम हा गुणधर्म असल्याने उन्हाळ्यात अंडी खाणे टाळले जाते. पण तज्ज्ञांच्या मते तुम्ही बाराही महिने अंडी खाऊ शकता.

मात्र तीही योग्य प्रमाणात. अंड्यात उष्णता असल्याने उन्हाळ्यात ते खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढते. ज्यामुळे अपचन, अस्वस्थ वाटणे असा त्रास होऊ शकतो. यामुळे ती प्रमाणात खावीत. जर तुम्ही रोज 4 अंडी खात असाल तर उन्हाळ्यात त्यांची संख्या अर्धी म्हणजे 2 करावी. कारण शरीरात उष्णता वाढल्यास आतड्यांना इजा पोहोचू शकते. त्यातच उन्हाळ्यात शरीराचे तापमानही वाढते. यामुळे योग्य ती काळजी घेऊन अंडी प्रमाणात खाल्ल्यास त्रास होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात अंडी घाताना एवढी काळजी अवश्य घ्यावी.