मेट्रो-३ला पर्यावरण मंत्रालयाची परवानगी आहे का?

सामना ऑनलाईन,मुंबई

मेट्रो-३ प्रकल्पांतर्गत दक्षिण मुंबईत उभारण्यात येणाऱया तीन मेट्रो स्थानकांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी आहे काय, असा सवाल उच्च न्यायालयाने आज मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला केला.या परवानगीची सर्व कागदपत्रे सादर करा. तर परवानगी घेतलेली नसेल तर परवानगी आवश्यक नसल्याचे स्पष्टीकरण द्या, तसे प्रतिज्ञापत्र सादर करा असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन  (एमएमआरसीएल)ला दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मेट्रो-३ प्रकल्प लटकण्याची चिन्हे आहेत.