प्रियंका चोप्रा गरोदर? हॉलीवूड अभिनेत्रीने दिले संकेत

25

सामना ऑनलाईन । कान्स

अभिनेत्री प्रियंका चोप्राने सध्या कान्स चित्रपट महोत्सवात तिच्या एका पेक्षा एक सुंदर लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकीकडे तिच्या लूकची चर्चा सुरू असतानाच प्रियंका गरोदर आहे की काय अशी देखील चर्चा सगळीकडे रंगली आहे. याबाबचे संकेत हॉलीवूडमधील एका अभिनेत्रीनेच दिले आहेत.

प्रियंकाने कान्समध्ये दुसऱ्या दिवशी एक गाऊन घातला होता. या गाऊनमध्ये प्रियंका गरोदर असल्यासारखी दिसत होती. त्यावरून चर्चा सुरू असतानाच प्रियंकाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोवर हॉलीवूड अभिनेत्री ओक्टाविया स्पेंसर हीने Stunning Mamacita असे लिहले होते. याचा इंग्रजीत अर्थ हॉट मम्मा होतो. ओक्टाविया हिच्या या कमेंटमुळे प्रियंका खरंच गरोदर आहे की काय अशी चर्चा रंगली आहे.

12 मे ला मदर्स डे च्या दिवशी प्रियंकाने तिला आई व्हायचे आहे अशी प्रतिक्रीया दिली होती. अमेरिकेतील एका मुलाखतीत ‘तू तुझी फॅमिली कधी वाढवणार’, असा सवाल तिला करण्यात आला. त्यावर ती म्हणाली, मला असा प्रश्न अनेकदा विचारतात. माझ्या मित्रांनाही मुलं आहेत, त्यामुळं आता तूसुद्धा मुलांचा विचार कर असा सल्ला अनेकजण देत असतात. मलाही आई होण्याचा आनंद आणि अनुभव घ्यायचा आहे, असं तिने स्पष्ट केलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या