रजनीकांत यांच्या पक्षचिन्हातही कमळ?

22

सामना ऑनलाईन । चेन्नई

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची चित्रपटाचा पडदा ते राजकारण अशी नेहमीची परंपरा कायम राखत थलैवा रजनीकांत यांनी राजकारण प्रवेशाची घोषणा केली. तमीळनाडू विधानसभेच्या २३४ जागा लढवण्याचा निर्धार केलेल्या रजनीकांत यांनी अद्याप पक्षाचं नाव घोषित केलेलं नाही. पण, त्यांच्या सभेच्या व्हायरल झालेल्या एका फोटोतून त्यांच्या पक्षाचं चिन्ह काय असेल याचा अंदाज येऊ शकतो.

rajini-party-symbol

या फोटोत रजनीकांत उजव्या हाताने एक विशिष्ट खूण करून दाखवत आहेत. ही खूण इंग्रजीतील रॉक संगीताचं प्रतीक म्हणून वापरण्यात येते. फोटोत त्यांच्या पाठीमागे असलेल्या चित्रातही हीच खूण दिसत असून त्याखाली कमळाचं चित्र आहे. फोटोग्राफर्सना अशी पोज देऊन फोटो काढण्यामागे नक्की काय कारण असावं, ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. तर दुसरीकडे या फोटोत रजनीकांत यांच्या पाठीमागे असलेलं चित्र हेच त्यांच्या पक्षाचं चिन्ह असावं, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या