डान्समध्ये शाहीदला टक्कर भाऊ ईशानची

सामना ऑनलाईन । मुंबई

शाहीद कपूरला बॉलीवूडमध्ये डान्सिंग स्टार म्हणून ओळखले जाते. पण आता शाहीदला भाऊ ईशान खट्टरकडून डान्समध्ये तगडे कॉम्पिटीशन मिळणार आहे. ईशानने इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तो डान्सच्या भन्नाट स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडीओवरून ईशान आणि शाहीदच्या डान्स करण्याच्या पद्धतीवर बरेच साम्य असल्याचे दिसले.

ईशान लवकरच ‘बियोंड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असून हा चित्रपट लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाबरोबरच ईशान मराठी चित्रपट ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात ईशानसोबत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आर्चीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे शूटिंग १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.