पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारींना अटक

49

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना सोमवारी अटक करण्यात आली. एका बँक घोटाळय़ात त्यांना बेडय़ा ठोकण्यात आल्या आहेत. अटक टाळण्यासाठी झरदारी यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पण ती कोर्टाने फेटाळल्यानंतर त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. याच प्रकरणी ते जामिनावर होते. मात्र सोमवारी न्यायालयाने त्यांचा जामीन अवधी वाढविण्यास स्पष्ट नकार दिला. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) नेते झरदारी यांच्यावर कोटय़वधी डॉलर्सच्या रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांची बहीण फरयाल तालपूर हीदेखील आरोपी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या