करंजी जिल्‍हापरिषद शाळेला “आय एस ओ” मानांकन


सामना प्रतिनिधी । कोपरगाव

शिक्षणाची स्पर्धा जरी वाढत असली तरी ग्रामीण भागातून शिक्षण घेणारे विद्यार्थी राज्य व देशपातळीवरचांगल्य्या पदांवर पोहचून कुटुंब गाव व राज्याची सेवा करू शकतात तेंव्‍हा गाव शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी राजकारणाविरहित एकत्र या असे आवाहन शिवसेनेचे नगर उत्‍तर जिल्‍हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी खा. सदाशिव लोखंडे यांच्‍या खासदार निधीतून करंजी शाळेला दोन संगणक संच प्रदान करतांना केले. तर ब्रिटीशकालीन करंजी जिल्‍हापरिषद शाळेला “आय एस ओ” मानांकन प्राप्त होणे हे कौतुकास्पद असुन स्थानिकांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आल्‍याचे ते फलित असल्‍याचेही त्‍यांनी सांगीतले. अध्यक्षस्‍थानी रयत संस्‍थेचे जनरल बॉडी सदस्‍य कारभारी नाना आगवण हे होते.

यावेळी संचालक भास्करराव भिंगारे, प्रमोदजी(आण्णा)लबडे बहुद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण खर्डे, शिवसेनेचे शिवाजी जाधव, युवासेनेचे कार्याध्यक्ष चंदूनाना भिंगारे,उपसरपंच रवींद्र आगवण, दत्तात्रय भिंगारे,बळीराम थेट,भाऊसाहेब शहाणे, बाळासाहेब भिंगारे, सांडूभाई पठाण, नाथा पा. आगवण, भाऊसाहेब शेळके,संजय शिंदे,मुख्याध्यापक चंद्रकांत माळी (सर), नंदकुमार थोरात, स्टाफ,व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रमोद लबडे म्‍हणाले, राज्यातील चांगल्या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी ६५% अधिकारी ग्रामीण भागातूनच शिक्षण घेऊन पुढे आले असून ग्रामीण शिक्षण व संस्कृती हे यशस्वी व्यक्ती होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने भक्कम पाय ठरणारे आहे. चांगल्या शिक्षणामुळे विद्यार्थ्याला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चितच मदत होत असते त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोइ सुविधा निर्माण करून देतांना खा. सदाशिव लोखंडे यांच्‍या खासदार निधीतून जि.प. च्या शाळेंना जवळ जवळ ७७ संगणक संच दिले असून त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना चांगले शिक्षणासाठी मदत होईल.
अध्यक्षीय भाषणात कारभारी आगवण म्‍हणाले, शाळेसाठी जि. प. कडून खोल्या मंजूर झाल्याचे सांगीतले. तर भास्करराव भिंगारे यांनी शिर्डी संस्थांकडूनही शाळेकरिता खोली मंजूर केल्याचे सांगीतले. शिवसेना पदाधिकारी स्थानिक शिवसेना कार्यकर्ते व उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांचे गावाच्‍या वतीने आभार मानण्यात आले. आभार शिवाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षित होऊन शेतीपेक्षा व्यवसाय व चांगल्या पदावर काम करण्यासाठी बाहेर पडावे असे सांगितले. यावेळी रवींद्र आगवण यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन मोहन रासकर व हरी वाघ यांनी केले.

गट-तट राजकारण बाजुला ठेवून शैक्षणिक कार्यात आम्ही एकत्र येत असतो म्‍हणुनच करंजी शाळेच्या विकासाला आम्ही चालना देऊ शकलो.आज आम्‍ही स्थानीक पुढारी म्‍हणुन वेगवेगळया गटाचे असलो तरी आम्ही सर्व या एकाच शाळेत एकत्रित व बरोबर शिक्षण घेतले आहे. तेंव्‍हा आम्‍ही शिक्षणाचे महत्व ओळखून आहोत म्‍हणुन आम्ही शाळेसाठी एकत्रित योगदान देत आहोत – कारभारी नाना आगवन