इस्त्रोची कमाल, ढगांआडूनही शत्रूवर नजर ठेवणाऱ्या उपग्रहाचे प्रक्षेपण

51

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. बुधवारी एक ऐतिहासिक पाऊल उचलत इस्त्रोने सॅटलाईट ‘RISAT-28’ चे यशस्वी प्रक्षेपण केले आणि पृथ्वीच्या कक्षेमध्ये स्थापन केले.

बुधवारी सकाळी 5.30 मिनिटांनी आंध्रप्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाच्या मदतीने ढगांआडूनही शत्रूवर नजर ठेवण्यात येईल. यामुळे हिंदुस्थानी लष्कराला बळ मिळाले आहे.

उपग्रहाबाबत माहिती देताना इस्त्रोचे अधिकारी म्हणाले की, याआधी प्रक्षेपित केलेल्या रेग्यूलर रिमोट सेसिंग या ऑप्टिकल इमेजिंग सॅटेलाईटद्वारे पृथ्वीवर सुरू असणाऱ्या छोट्या घटना टिपता येत नव्हत्या. परंतु आता सिंथेटिक अपर्चर रडार अर्थात सार याची कमी पूर्ण करेल. हा उपग्रह कोणत्याही वातावरणात काम करण्यास सक्षम आहे. अगदी ढगाळ वातावरण असले किंवा मुसळधार पाऊस असला, किंवा रात्रीचा गर्द अंधार असला तरी उपग्रहाद्वारे छोट्या घटनाही टिपता येणार आहेत. शत्रूची अचूक माहिती सुरक्षा दलाच्या जवानांपर्यंत पोहोचण्यासाठी याचा वापर होईल.

आपली प्रतिक्रिया द्या