अतिक्रमणांवरून प्रशासनाचे वाभाडे काढले

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

मनपाचे अतिक्रमण विभागप्रमुख सी. एम. अभंग यांना ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे तीव्र पडसाद आजच्या सर्वसाधारण सभेत उमटले. नगरसेवकांनी आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरत भ्रष्टाचाराच्या विळख्यात अतिक्रमण विभाग असल्याचे लाचखोरीच्या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. लाचखोरी करणाNया अधिकाNयास तात्काळ निलंबित करावे, त्यांच्यासोबत असलेल्या वंâत्राटी कर्मचाNयावर व संबंधित एजन्सीवर कारवाई करा असे सांगत प्रशासनाचे वाभाडे काढले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिक्रमण विभागाने बांधकामासह रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई तातडीने सुरू करावी तसेच वंâत्राटी कर्मचाNयांबद्दल एजन्सीच्या नियम व अटींची तपासणी करून दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश प्रशासनाला दिले.

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला आज मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. सभेला सुरुवात होताच नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी मनपाचा अतिक्रमण विभाग लाचखोरीमध्ये अडकला आहे. अतिक्रमण विभागप्रमुख अभंग हे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेल्यामुळे नगरसेवकांना मान खाली घालण्याची वेळ आली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नगरसेवकांकडून वारंवार पत्रव्यवहार केला जातो. अधिकाNयांना सांगितले जाते, परंतु अधिकारी फोन उचलत नाहीत, तक्रारीची दखल घेत नाहीत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अतिक्रमण वाढत चालले आहे. माहितीचा अधिकार अर्जात अतिक्रमण झाल्याचे कळविण्यात येत असेल तर प्रशासनाकडून तातडीने कारवाई का होत नाही. पैशाच्या लोभापायी अधिकारी मनमानीपणे काम करीत आहेत. नागरिकांच्या रोषाला मात्र नगरसेवकांना सामोरे जावे लागते. मनपाच्या जागेवर झालेली अतिक्रमणे काढली जात नाहीत. अतिक्रमण विभागात भ्रष्टाचार बोकाळला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे या विभागात भ्रष्टाचार होत असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये कोणकोणते अधिकारी सहभागी आहेत याची चौकशी झाली पाहिजे, तक्रारी आल्या तर कारवाई का झाली नाही, नागरिकांना दिलासा मिळेल असे काम होणे अपेक्षित आहे. मनपाची नाहक बदनामी होता कामा नये. या प्रकरणी प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी जंजाळ यांनी केली. माजी महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले, खासगी एजन्सीमार्पâत  नियुक्त वंâत्राटी कर्मचाNयावर कोणती कारवाई  केली, त्याचबरोबर एजन्सीवर कारवाई का झाली नाही, एजन्सीसोबत झालेल्या अटी व नियमांमध्ये कारवाई करण्याबद्दल कोणती तरतूद आहे. अटी व नियमांचा भंग झाला असेल तर एजन्सीचा करार रद्द का केला जात नाही, मनपाची बदनामी झाल्यामुळे एजन्सीवर कारवाई करावी, अशी मागणी तुपे यांनी केली.

नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी क्रांतीचौक वॉर्डात उन्नती लॉनच्या जागेवर अनधिकृतपणे मंगल कार्यालय उभारण्यात आले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पीआर कार्ड करून घेतले. मनपाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याची कागदपत्रे मालमत्ता विभागाकडे देण्यात येऊनही अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. अखेर मंगल कार्यालयाच्या मालकाने न्यायालयात जाऊन स्थगिती आणली आहे. वारंवार कारवाई करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही, अशी तक्रार वाडकर यांनी केली. नगरसेवक प्रमोद राठोड, राजू शिंदे यांनी अतिक्रमण विभाग कशा पध्दतीने काम करीत आहे, या विभागात दलालांचा कसा सुळसुळाट झाला आहे याचे उदाहरणांसह दाखले दिले. नगरसेविका मनीषा लोखंडे यांनी पडेगाव ते भावसिंगपुरा हा ५० मीटरचा डीपी रोड मंजूर आहे.

परंतु या रोडवर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण काढून मार्विंâग कधी करणार, रस्त्यावरील अतिक्रमण कधी काढणार असा सवाल केला. ऋषिकेश खैरे यांनी समर्थनगर वॉर्डातील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला.   वारंवार सांगूनही कारवाई होत नाही. मात्र नाही तेथे अतिक्रमण विभाग जाणूनबुजून कारवाई करीत आहे. हे थांबले पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी स्वाती नागरे, मनीषा मुंढे, सुरेखा सानप, मोहन मेघावाले, चेतन कांबळे, नितीन चित्ते, राजगौरव वानखेडे, भाऊसाहेब जगताप यांनी अतिक्रमण विषयावर प्रशासनाला धारेवर धरले. सभागृह नेता विकास जैन यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई नगरसेवक पाहून केली जाते. आयुक्तांनी दिलेला उपद्रव शोध पथक स्थापन करण्याचा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा आहे. माजी सैनिकांच्या पथकांची प्रभागनिहाय नियुक्ती केली जाणार आहे. या पथकामुळे अतिक्रमणांवर वचक बसणार आहे. आयुक्तांनी अतिक्रमण विभाग सक्षम करावा, अशी मागणी केली.

अतिक्रमणांचा आराखडा तयार करून धोरण ठरवा

महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, अतिक्रमण विभाग प्रमुख लाचखोरीमध्ये अडकला गेल्याने सर्व नगरसेवकांची मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. खासगी एजन्सीमार्पâत भरती करण्यात आलेल्या कर्मचाNयाची चौकशी करावी. तसेच माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज देणारे वारंवार तेच तक्रारदार असतील तर अशा तक्रारदारांची  नगररचना, मालमत्ता आणि अतिक्रमण विभागातील अधिकाNयांनी गोपनीय माहिती पोलीस आयुक्तांना द्यावी. उन्नती लॉनवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, तक्रार प्राप्त होताच त्याची प्रभावीपणे व पारदर्शकतेने कारवाई व्हावी. याची माहिती महापौर व संबंधित नगरसेवकांना देण्यात यावी. अतिक्रमणधारकास नोटीस बजावताना त्यामध्ये नगरसेवकाचे नाव टाकण्यात येऊ नये. नारेगावमधील शाळेसमोरील अतिक्रमण काढण्यात यावे, अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारकाकडून दंडासह खर्चाची रक्कम वसूल करावी जेणेकरून पुन्हा अतिक्रमण होणार नाही. प्रशासनाने अतिक्रमणासंदर्भातील आराखडा तयार करून धोरण ठरवावे. खासगी एजन्सींसह वंâत्राटी कर्मचाNयावर कठोर कारवाई करावी, असे आदेश प्रशासनाला दिले.

प्राधान्यक्रम ठरवून अतिक्रमणे काढणार

ह  आयुक्त डॉ. निपुण विनायक म्हणाले, अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभागाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अतिक्रमण विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त दीपक कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अनधिकृत वसाहतींची माहिती घ्यावी लागेल. मालमत्ता सर्वेक्षणातून अनधिकृत मालमत्तांची माहिती समोर येत आहे. मोठ्या इमारतींवर अगोदर कारवाई झाली पाहिजे. नियोजन पध्दतीने काम करावे लागेल. प्राधान्यक्रम ठरवून अतिक्रमण काढले जाईल. लाच घेतल्याच्या घटनेमुळे मनपाची बदनामी झाली आहे. खासगी एजन्सीच्या कर्मचाNयावर गुन्हा दाखल करून एजन्सीवर दंडात्मक कारवाई केली जाईल. कर्मचाNयांचे पगार रोखणाNया एजन्सीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे आयुक्त विनायक यांनी सांगितले.