2025 पर्यंत राम मंदिर झालेच पाहिजे! भैय्याजी जोशींचा मोदी सरकारला इशारा

1

सामना ऑनलाईन, प्रयागराज

राम मंदिराप्रश्नी मोदी सरकारने घेतलेली बोटचेपी भूमिका आणि न्यायपालिकेवर ढकलून दिलेली जबाबदारी यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वैतागला आहे. यामुळे संघाने मंदिर निर्माणासाठी डेडलाईनच निश्चित करून टाकली आहे. सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी 2025 पर्यंत राम मंदिर झाले पाहिजे अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले आहे. हा मोदी सरकारला थेट इशारा असल्याचं बोललं जात आहे.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेची प्रयागराज इथे एक बैठक सुरू आहे.  या बैठकीला भैय्याजी जोशी देखील उपस्थित आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की ” मंदिर व्हावे आणि ते 2025 पर्यंत पूर्ण व्हावे अशी आमची इच्छा आहे.” यावर सरकारने अध्यादेश आणावा का असा प्रश्न विचारला असता त्यांनी ‘ते सरकारने ठरवावे’ असे म्हटले आहे. मंदिराचे निर्माण 2025 ला पूर्ण व्हावे की त्याची सुरुवात 2025 ला व्हावी असा प्रश्न विचारला असता भैय्याजी जोशी म्हणाले की ” 2025 ला सुरुवात करण्याचं थोडेच म्हणालो आहे, आजपासून सुरुवात केल्यास 5 वर्षात मंदिर उभे राहील”