जायकवाडी धरणाजवळ ‘पत्रा बॉम्ब’ नाही, तर पोलिसांचा सराव!

jayakwadi-dam-bomb

सामना प्रतिनिधी । पैठण

जायकवाडी धरणावर बॉम्ब असल्याची ती अखेर अफवाच ठरली असून पैठण पोलिसांच्या सरावाचा हा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. दर 15 दिवसांनी अशा प्रकारचे सराव या भागात घेतले जातात, मात्र पथकाला याबद्दलची कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण असते, मात्र पाहणी पूर्ण झाल्यावर सराव असल्याचे जाहीर करण्यात येते.

दरम्यान, मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाच्या मुख्य सुरक्षा भिंतीजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचे आज सकाळी आढळून आल्याची बातमी वेगानं पसरली होती. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. मात्र हा सरावाचा भाग असल्याचे स्पष्ट होताच साऱ्यांनी मोकळा श्वास घेतला. पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या देखरेखीत हा सराव करण्यात आला.