फेसबुकवर फोटो टाकला आणि अटक झाली 

सामना ऑनलाईन । मेक्सिको
फेसबुकवर फोटो टाकला आणि पोलिसांनी अटक केली. हा प्रकार जरी चमत्कारीक वाटत असला तरी हे खरोखर घडलंय. मेक्सिकोमधील दक्षिण विभागात अमली पदार्थ तस्करानं आपला फोटो फेसबुकवर टाकला आणि पोलिसांना त्याचा सुगावा लागला. त्यांनी तात्कळ त्या तस्कराला अटक केली.
मेक्सिकोत अमली पदार्थांचा मोठा बाजार चालतो. जियलिओ पेरोन हा आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांचा तस्कर इटली आणि मेक्सिकोत अमली पदार्थांचं जाळं टाकत होता. न्यायालयानं त्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. मात्र गेल्या २० वर्षांपासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता.
सेवरियो गार्सियो गॅलोरो नावानं उघडलेल्या अकाऊंटवरून त्यानं एक फोटो टाकला आणि पोलिसांना तो आयताच सापडला. हा फोटो मेक्सिको आणि इटलीच्या सीमेजवळ असलेल्या एका भागातील असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सापळा रचत त्याला अटक केली. अटक केल्यानंतर इटलीमध्ये अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात न्यायालयाने जियलिओला २२ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.