नदालच्या जेतेपदाची नवमी; जोकोविचवर मात


सामना ऑनलाईन । इटली

द्वितीय मानांकित स्पेनच्या राफेल नदालने अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा पराभव करून इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. नदालचा जोकोविचवर हा 26 वा विजय असून त्याने नवव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

नदालने किताबी लढतीत जोकोविचवर 6-0, 4-6, 6-1 अशी मात केली. नदालने अंतिम लढतीत तिसऱ्यांदाचा जोकोविचला हरविण्याचा पराक्रम केला तर आतापर्यंत ते 54 वेळा आमनेसामने आले. नदालसाठी ही 50 वी तर जोकोविचसाठी 49वी मास्टर्स फायनल होती. महिला एकेरीत झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिसकोवा हिने विजेतेपदाला गवसणी घातली.