हिंदुस्थानचा पहिला ड्युअल फ्रंट कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च

सामना ऑनलाईन । मुंबई

आयटेल मोबाइल कंपनीने आपली स्मार्टफोन श्रेणी अधिक प्रबळ करत ड्युअल-फ्रंट कॅमेरा स्मार्टफोन ‘एस२१’ बाजारात दाखल केला आहे. आयटेल ‘एस२१’ स्मार्टफोन प्रिमिअम दर्जा देतो. या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सोशल मीडिया अकाऊंट्स यांसारखे फिचर्स आहेत. हा स्मार्टफोन कमी किंमतीमध्ये सर्वोत्तम फिचर्स देतो. ‘एस२१’ मध्ये १६ जीबीची इंटर्नल मेमरी आहे, जी ३२ जीबीपर्यंत वाढवताही येऊ शकते. हा फोन ३६० अंश रिडिबिलिटीसह फिंगरप्रिंट सेंसरयुक्त आहे.

सेल्फीप्रेमी तरुण पिढीसाठी असलेला आयटेलचा ‘एस२१’ स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्रण्ट कॅमेरासह १२० अंश कोनातील पॅनोरॅमिक व्ह्यू समाविष्ट आहे. हा व्यापक अपार्चर पर्याय युजर्सना परिपूर्ण ग्रुप सेल्फीज काढण्याची सुविधा देतो. पॉवर-पॅक स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सल रिअर कॅमेऱ्यासह ऑटो-फोकस, फेस डिटेक्शन व इतर आकर्षक फिचर्स देखील समाविष्ट आहेत. स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची आयपीएस स्क्रिन व ब्ल्यू-रे आय प्रोटेक्शन, सनलाइट आहे. हे डिस्प्ले अधिक प्रखर व सर्वोत्तम दृश्य अनुभव देते. हा फोन रुपये ६०००/- किमतीमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

आयटेल अँड स्पाइस डिवाईसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर कुमार म्हणाले, ”आमच्या स्मार्टफोन पोर्टफोलिओमधील इतर उत्पादनांप्रमाणे ‘एस२१’ हा देखील उत्तम वैशिष्ट्ये असलेला स्मार्टफोन आहे. आम्ही बाजारपेठेत खळबळ निर्माण करणारे तंत्रज्ञान आणि अद्वितीय नाविन्यता दाखल करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे आणि ‘एस२१’ हे आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्याच्या आमच्या प्रयत्नांचे एक उदाहरण आहे.”