सोफ्याखालील बॉम्बचा स्फोट, निवडणुकीच्या बैठकीत मंत्र्यांचा मृत्यू

1

सामना ऑनलाईन। काबूल

हल्लेखोरांनी सोफ्याखाली लपवून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने अफगाणिस्तानमध्ये एका लोकप्रिय मंत्र्यासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. अब्दुल जब्बार कहरमान असे त्यांचे नाव आहे. दरम्यान, या स्फोटाची जबाबदारी तालिबानी संघटनेने घेतली आहे.

अफगाणिस्तानमध्ये 20 तारखेला लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्याबद्दल कहरमान कार्यकर्त्यांबरोबर लशकरगाह येथे चर्चा करत होते. त्याचवेळी अचानक ते बसले होते त्या सोफ्याखालील बॉम्बचा स्फोट झाला. यात चारजण ठार झाले तर अन्य सात जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान तालिबान्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रवक्ते उमर झवाक यांनी दिली आहे.