जैन धर्मगुरू तरुण सागर यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

जैन मुनी तरूण सागर यांचे आज सकाळी 3 वाजून 18 मिनिटांनी निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी ३ वाजता दिल्लीतील मेरठ महामार्गावर असलेल्या तरुणसागरम तीर्थ इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

भाजपचे खासदार महेश गिरी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत एक ट्वीट केले आहे

त्यांचा कावीळ झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. उपचारानंतरही प्रकृती सुधारत नसल्याने त्यांनी डॉक्टरांना उपचार करू नये अशी विनंती केली होती.  त्यानंतर त्यांनी संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता.