१४ आणि १५ जुलैला इंटरनेट सेवा बंद, का ते वाचा…

सामना ऑनलाईन । जयपुर

इंटरनेट ही सध्या काळाची गरज आहे. पण याच इंटरनेटचा गैरवापर परीक्षांमध्ये कॉपी करण्यासाठी केला जात आहे. यामुळे कॉपीचे हे गैरप्रकार रोखण्यासाठी जयपूरमध्ये १४ आणि १५ जुलै रोजी इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

१४ व १५ जुलैला जयपूरमध्ये पोलीस भरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यामुळे परीक्षा केंद्रापासुन ५ किलोमीटर पर्यंतच्या परीसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार आहे. पोलीस मुख्यालयाने ऑफलाइन परीक्षेत कॉपी चे प्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

६६४ केंद्रांमध्ये पोलीस भरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे. पोलीस विभागातील १३,१४२ पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. यासाठी तब्बल १५ लाखां पेक्षा आधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या परीक्षेत कॉपीचे गैर प्रकार रोखण्यासाठी ही परीक्षा पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेतली जाणार आहे.