सीमेपलीकडून आले होते जैशचे दहशतवादी, 10 दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये झाली होती रॅली

7

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीर मधील पुलवामामध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले असून 45 जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी 18 जवान गंभीर जखमी आहेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी जवानांच्या दोन वाहनांना लक्ष्य केले होते.

#PulwamaTerrorAttack : घटनास्थळावरील हे फोटो विचलित करू शकतात

5 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये जैश मे मोहम्मदची रॅली झाली होती. या रॅली दहशतवाद्यांच्या 7 टीम होत्या. आणि हिंदुस्थानाअत घातपात करण्याची जबाबदार्री त्यांच्यावर होती. या रॅलीमध्ये मौलाना मसूद अजहरचा लहान भाऊ आणि संघटनेचा म्होरक्या मौलाना अब्दुल रऊफने हिंदुस्थानात धडा शिकवण्याचे जाहीर केले होते.

Terror attack list उरीनंतर जम्मू-कश्मीरमध्ये झालेले सर्वात मोठे हल्ले…
विरोधकांनी केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध, मोदींना केले लक्ष्य

गेल्या दोन दिवसांत गुप्तचर संघटनांनी ऍलर्ट जारी केला होता की देशात निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर दहशतावी नेत्यांवर हल्ला करू शकतात. परंतु कराचीमध्ये झालेल्या रॅलीमध्ये मौलाना रऊफने कश्मीरच्या टेकड्यांपासून पुढील भागात विध्वंस करण्याचे जाहीर केले होते.