३ महिने जेटली गायब; काय झालं होतं, वाचा सविस्तर

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे जवळपास ३ महिने देशाच्या राजकारणातून गायब झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आज होणाऱ्या राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी ते हजर राहणार आहेत. उपसभापतीपदाची निवड होताच ते तत्काळ निघून जाणार आहेत. जेटली नाराज तर नाही ना? जेटलींचं नेमकं काय चाललं असे प्रश्न दिल्लीतील घडामोडी माहिती नसणाऱ्यांना पडले होते. मात्र ते गायब होण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे

जेटली हे किडणीच्या विकाराने त्रस्त होते. १४ मे रोजी त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होऊ नये म्हणून जेटली यांना लोकांना भेटण्यास डॉक्टरांनी मनाई केली होती. याचकारणामुळे ते जवळपास ३ महिने जे काही काम असेल ते घरातूनच करत होते.