शहीद जवान नितीन राठोड यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली

सामना प्रतिनिधी । जालना

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान नितीन राठोड हे शहीद झाले असून त्यांचे पार्थिव आज त्यांच्या गावी नेण्यात आले. यावेळी जालना येथे त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून त्यांना श्रध्दांजली देण्यात आली.

यावेळी नितीन राठोड अमर रहे, अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासह हजारो जालनावासींनी उपस्थिती दर्शवली.