पाण्यासाठी जळगाव नेऊरचे शेतकरी आक्रमक

फोटो प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । येवला

जळगाव नेऊर येथे १६ डिसेंबरला आलेल्या पालखेड पाण्याच्या आवर्तनानंतर पिकांसाठी पुन्हा तब्बल दोन महिन्यांची प्रतीक्षा करूनही अद्याप पाणी मिळालेले नाही. पाण्याअभावी रब्बी पिके धोक्यात सापडल्यामुळे शेतकरी वर्गाने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांची बोळवण होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली. या वेळी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शनिवारपर्यंत पाणी सोडण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले.

तब्बल दोन महिने पाणी न मिळाल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी गुरूवारी आकमक भूमिका घेतली. वारंवार तक्रारी मागण्या करूनही अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनी अखेर पाटबंधारे कार्यालय गाठले. मात्र संबंधित अधिकारी तेथे उपस्थित नसल्याने शेतकऱयांचा हिरमोड झाला व नाराजी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी मंडल अधिकारी मंगेश धवन हे आपल्या कार्यालयात जात होत़े. शेतकरी वर्गाने त्यांना घेराव घालून पाटबंधारे विभागाचे अधिकारी भागवत यांच्याशी फोनवर चर्चा करण्यास भाग पाडले. जळगाव नेऊर येथे चारी क्र. २८ व २९ ला तत्काळ पाणी मिळावे या मागणीबाबत चर्चा करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. भागवत यांनी शनिवारपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.

या वेळी पाणी वापर संस्थेचे बाजीराव सोनवणे, प्रभाकर घुले, भाऊसाहेब चव्हाणके, वसंत शिंदे, रामदास घुले, सदाशिव शिंदे, माधव घुले, ज्ञानदेव तिपायले, रघुनाथ शिंदे, संजय घुले, सोपान तांबे, दत्तात्रय दौंडे, विलास देशमुख, तुकाराम गायकवाड, बाळू दौंडे, खंडेराव चव्हाणके, विलास कुऱ्हाडे, हनुमान उकाडे, केदार कुऱहाडे, बाळासाहेब सोनवणे, अंबादास शिंदे, अर्जुन तांबे, अर्जुन शिंदे, साहेबराव दाते, साहेबराव घुले, विक्रम गायकवाड, दादा गायकवाड, दगु गायकवाड, ज्ञानेश्वर पवार, भाऊसाहेब घुले, संजय शिंदे, सुरेश वाघ, नवनाथ शिंदे, कैलास शिंदे, गणेश तांबे आदी शेतकरी उपस्थित होते.

या पाणी वापर संस्थांना पाणी नाही
जय बजरंग पाणी वापर संस्था, माधवराव पाटील पाणी वापर संस्था, चारणबाबा पाणी वापर संस्था, सप्तश्रृंगी पाणी वापर संस्था, पांडुरंग पाणी वापर संस्था, मतोबा पाणी वापर संस्था, रघुनाथ पंढरीनाथ पाणी वापर संस्था, मानोरी पाणी वापर संस्था, मौनगिरी पाणी वापर संस्था, भागीरथा पाणी वापर संस्था, सद्गुरू पाणी वापर संस्था.