जळगावमध्ये लाचखोर मुख्याध्यापकाला रंगेहात पकडले

सामना प्रतिनिधी। जळगाव

यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापकास गुरुवारी पाच हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. विलास इच्छाराम राणे असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

तक्रारदार  शासकीय माध्यमिक आश्रमशाळा डोंगरकठोरा या आश्रमशाळेत भाजीपाला पुवरठा करतात. सदर भाजीपाला पुरवठ्याचे बिल त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याच्या मोबादल्यात आश्रमशाळेतील मुख्याध्यापक विलास इच्छाराम राणे यांनी तक्रारदार यांचेकडे 5 हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीवरून पथकाने सापळा रचला. मुख्याध्यापक विलास इच्छाराम राणे यांना पाच हजार रूपयांची लाच घेत असतांना पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, सहाय्यक निरीक्षक निलेश लोधी यांनी केली.