आमदाराची जीभ घसरली, बलात्कारपीडितेचा उल्लेख वेश्या म्हणून केला

सामना ऑनलाईन । जालंधर

जालंधरचे बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर एका ननने बलात्काराचा आरोप केला आहे. यावर केरळचे आमदार पी. सी. जॉर्ज यांनी वादग्रस्त विधान केल्याने खळबळ उडाली आहे. ”ननच्या वेश्या असण्यावर कुणालाही काही शंका नाही. १२ वेळा तिने शरीरसुखाचा आनंद घेतला. त्यानंतर १३ व्या वेळी बलात्कार? तिने सुरुवातीलाच तक्रार का नाही केली?” असा सवालही या आमदाराने केला आहे.

पंजाबमधील जालंधर येथे जुलै महिन्यात एका ननने बिशप मुलक्कल यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तसेच बिशपला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करत तिने बिशपविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले होते. बिशप कामानिमित्त वरचेवर केरळला येत. त्यादरम्यान त्यांनी अनेकवेळी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले, असा आरोप ननने तक्रारीत केला होता. मीडियानेही हे प्रकरण उचलून धरले होते. यामुळे पोलिसांवर व चर्च प्रशासनावर दबाव वाढला होता. त्यानंतर केरळहून एक तपासणी पथक जालंधरला गेले होते. तिथे बिशप यांचा जबाब नोंदवण्यात आला. ननने बिशप यांच्या अटकेची मागणी करत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवारी ख्रिश्चन संघटनांसह शेकडो नन्सनी आंदोलन छेडले होते.

summary-/mla-remarks-nun-is-prostitute