जेम्स बॉण्डचा 25 वा चित्रपट

86

सामना ऑनलाईन । मुंबई

जेम्स बॉण्ड ही चाहत्यांमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखा. बॉण्ड चित्रपट मालिकेतील 25 वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 28 एप्रिलपासून जमायका येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवरून या चित्रपटाची माहिती दिली. चित्रपटाच्या 25 व्या भागात डॅनियल क्रेग हा जेम्स बॉण्डची भूमिका साकारणार आहे. डॅनियल तब्बल पाचव्यांदा ‘एजंट 007’ च्या रूपात दिसणार असून या भूमिकेसाठी त्याला तब्बल 450 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. तो 2006 पासून जेम्स बॉण्ड ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जपान आणि दक्षिण फ्रान्समध्ये होणार आहे. चित्रपटाची कथा रेमंड बेन्सन यांच्या ऱान र्अीस् द अग्हु या कादंबरीकर आधारित आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या जेम्स बॉण्डच्या चित्रपटांमध्ये क्रेग व्यतिरिक्त रोजर मूर, शॉन कॉनरी, प्रियस ब्रॉसनन, टिमोथी डॉल्टन आणि जॉर्ड लेजेनबे यांनी एजंट 007 ही भूमिका वठविली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा कॅरी जोजी फुफुनागा सांभाळणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या