जम्मू-कश्मीरसह हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी, सतर्कतेचा इशारा

1

सामना ऑनलाईन। शिमला

जम्मू-कश्मीरसह हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असून येत्या दोन दिवसात बर्फवृष्टीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यादरम्यान, अनुचित घटना घडू नये म्हणून नागरिकांना सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जानेवारीच्या सुरूवातीपासूनच या भागात बर्फवृष्टीला सुरूवात झाली. यावर्षात पाचव्यांदा येथे बर्फवृष्टी होत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. येत्या सोमवार मंगळवारी बर्फवृष्टीचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर प़डू नये असे आवाहन राज्य सरकारने हवामान खात्याचा हवाला देत केले आहे. दरम्यान २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटकांनी गर्दी केली आहे. यापार्श्वभूमीवर काही ठराविक ठिकाणीच पर्यटकांनी फिरावयास जावे अशा सूचना हवामान खात्याने पर्यटकांना केल्या आहेत.