माजी विम्बल्डन विजेती याना नोवोत्ना कालवश

सामना ऑनलाईन । प्राग

झेक प्रजासत्ताकाची माजी विम्बल्डन विजेती याना नोवोत्ना हिचे कर्करोगाने वयाच्या ४९व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त वुमेन्स टेनिस असोसिएशनने दिले आहे. १९९८ ला फ्रान्सच्या नावालीया तौझियातला हरवून नोवोत्नाने कारकीर्दीतले पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले होते. तिने कारकीर्दीत चार महिला दुहेरी विम्बल्डन जेतीपदे पटकावली होती. नोवोत्नाला विम्बल्डन महिला एकेरी अंतिम लढतीत १९९३ला  जर्मनीच्या स्टेफी ग्राफकडून तर १९९७ ला स्वीत्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसकडून पराभव पत्करावा लागला होता.