जपानमध्ये जेबी चक्रीवादळाचा कहर


सामना ऑनलाईन। टोकियो

जपानमध्ये जेबी चक्रीवादळाने कहर केला असून २५ वर्षातील हे सगळ्यात मोठे चक्रिवादळ असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत या चक्रीवादळात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने शेकडो घरांचे छ्प्परं उडाली आहेत. तसेच निरनिराळ्या ठिकाणी पुलावरुन जाणाऱ्या लहानमोठ्या वाहनांसह मोठी वाहनेही हवेत उडून गेली आहेत.

japanee

ओसाका खाडीत घोंघावणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे भलीमोठ्या जहाजांनाही फटका बसला आहे. तसेच वातावरणात अचानक बदल झाल्याने कंसाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण करणारी ९०० विमान रद्द करण्यात आली आहे. यामुळे विमानतळावर ३,००० लोक अडकले आहेत. जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १९९३ सालानंतर जपानमध्ये आलेले हे सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ आहे. कंसाई भागात वीजेचे खांब पडल्याने दीड लाख घरांची वीज गेली आहे. तसेच पश्चिम जपानमध्ये दुपारी ताशी २१६ किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत आहेत. पंतप्रधान शिंजो आबे यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच सरकारकडून वादळग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही आबे यांनी दिले आहे. तसेच येत्या ४८ तासात चक्रीवादळाचा वेग वाढणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

summary-japan-scattered-due-to-j-b-cyclone