अनुप जलोटांची प्रेयसी जसलीनला करावा लागला होता गर्भपात, मॉडेलचा दावा


सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या काही दिवसांत भजन सम्राट अनुप जलोटा सातत्याने चर्चेत आहेत. कधी आपल्या वयाहून अत्यंत लहान असलेल्या प्रेयसीमुळे किंवा एका मॉडेलने केलेल्या गंभीर आरोपांमुळे. अनीशा सिंह या मॉडेलन त्यांच्यावर शारिरीक सुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता.

या आरोपांचे वादळ शमत नाही तोच या मॉडेलने अजून एक खळबजनक खुलासा केला आहे. अनुप जलोटांमुळे जसलीन गेल्या वर्षी गरोदर होती. अनुप जलोटा यांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने जसलीन गरोदर राहिली होती, त्यामुळे जसलीन आणि जलोटा यांच्या भांडणे वाढली होती. या सर्व घटनांचे आपण साक्षीदार असल्याचे अनीशाने इंडिया स्कूप या वेबसाईटला सांगितले. नंतर जसलीनने  गर्भपात केला, तसेच जसलीन आपल्याला धोका देत असल्याची शंका खुद्द जलोटा यांनी अनीशाकडे व्यक्त केली. लंडनमध्ये तिचा प्रियकर असल्याचे जलोटा यांनी अनीशाला सांगितले होते. पण जलोटा यांनी जसलीना या बाबत विचारले असता तिने हे आरोप खोटे असल्याचे सांगितले.

जलोटांवर आरोप करणारी मॉडेल ही सुद्धा वादग्रस्त सेलिब्रिटी आहे. गेल्या काही दिवसांत तिने आपले न्युड फोटो सोशल मीडियावर टाकल्याने चर्चेत आली होती.