‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूला हिंदुस्थानचं कोच बनायचंय

सामना ऑनलाईन । सिडनी
ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज जेसन गिलेस्पी याने २००६ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गिलेस्पी आणि मॅकग्रा या जोडीनं ऑस्ट्रेलियन संघाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. गिलेस्पीला हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाबाबत प्रश्न विचारला असता, त्याने याबाबत भविष्यात याबाबत विचार करू शकतो असं उत्तर दिलं आहे.ॉ

क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूने दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थांनी संघाचं प्रशिक्षक पद भूषवणे हे गौरवास्पद काम आहे असं वक्तव्य गिलेस्पीनं केलं आहे. नुकत्याच प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल गिलेस्पीने रवी शास्त्री यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.