मोबाईलपासून केंद्रीय मंत्र्यांचा ‘दूर’ संचार

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

मोबाईलवरुन बोलत असताना त्यातून धोकादायक रेडिऐशन तयार होत असतात. सतत बोलण्याने हे रेडिऐशन शरीरात गेल्याने मोठे नुकसान होऊ शकते. यावर उपाय म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक शक्कल लढवली आहे.

केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत असताना नेहमी मोबाईलवरुन संभाषण करावे लागते. मोबाईलच्या रेडिऐशनमुळे आरोग्याला नुकसान पोहोचू नये यासाठी प्रकाश जावडेकर यांनी अनोखा प्रयोग करत, मोबाईलसोबत लॅन्डलाईन फोनचा रिसिव्हर जोडला आहे. यामुळे मोबाईलपासून काही अंतर राखले जाते.

शुक्रवारी प्रकाश जावडेकर संसदेत पोहोचले त्यावेळी त्यांच्या मोबाईलला जांभळ्या रंगाचा हॅन्डसेट लावला होता त्यावरुन ते फोनवर बोलत असल्याचे दिसले. याविषयी त्यांना या वापराबद्दल विचारले असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही मात्र, त्यांचा हा अनोखा अंदाज सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

मोबाईलच्या रेडिऐशन पासून बचाव करण्यासाठी डॉक्टर मोबाईलवर जास्त काळ न बोलण्याचा सल्ला देतात. मात्र, याबाबत कोणताही अभ्यास समोर आला नसल्याने याला वैज्ञानिक आधार नसल्याचेही ते सांगतात.