Video- आमदार जयंत पाटलांनी शाहरुख खानला सुनावले खडे बोल!

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानला शेकापचे आमदार जयंत पाटील यांना त्याच्या चाहत्यासमोर चांगलचं झापलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ३ नोव्हेंबरचा आहे, ज्यावेळी शाहरुख त्याचा वाढदिवस साजरा करून त्याच्या अलिबागच्या फार्म हाऊसवरून परतत होता. गेट वे ऑफ इंडिया येथे शाहरुख आणि जयतं पाटलांची बोटी समोरा समोर आली, त्यावेळी जयंत पाटलांनी शाहरुखला खडे बोल सुनावले.

शाहरुख गेट वेला आला त्यावेळी त्याच्या चाहत्यांना त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र गर्दी टाळण्यासाठी शाहरुख बराच वेळ बोटीतच बसून राहिला. त्यामुळे अलिबागच्या दिशेने निघालेल्या जयंत पाटलांनी शाहरुखची बोट बाजुला होईपर्यंत वाट पाहावी लागली. यामुळे जयंत पाटलांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी चाहत्यांसमोरच शाहरुखला सुनावलं.