सतत जिन्स धुता मग ‘हे’ वाचा!

सामना ऑनलाईन । मुंबई

हल्ली तरूणांपासून प्रौढांपर्यंत सगळेजण जिन्स वापरताना दिसतात. जिन्स हा असा एकमेव पेहराव आहे, ज्याचा तुम्ही कोणत्याही प्रसंगी वापर करू शकता. त्यामुळे जिन्सचे फॅड दिवसेंदिवस वाढत आहे. पण सतत जिन्स धुतल्याने ती खराब होऊ शकते. यासाठी काही उपयुक्त टिप्स…

१. जिन्स सहा महिन्यातून एकदा धुतली पाहिजे. असे केल्यास तुमची जिन्स बऱ्याच दिवस टिकते.

२. जिन्स धुण्याआधी त्याच्या मागील बाजूला दिलेल्या सूचना नक्की वाचा.

३. जिन्स शक्यतो थंड पाण्याने धुवावी.

४. जिन्सला उलटी करूनच धुवावे. यामुळे जिन्स बऱ्याच काळ टिकते.

५. जिन्स धुताना व्हिनेगर व मीठ टाकलेल्या पाण्याने धुवावे. यामुळे त्याचा रंग जात नाही.

jeans-1

६. जिन्सवर डाग पडला असेल, तर टुथब्रशने तो डाग स्वच्छ करा.

७. वॉशिंगमशीनमध्ये जिन्स धुण्याचे सहसा टाळा. तिला नेहमी हाताने धुवा.

८. जिन्स धुण्याचे जितके दिवस टाळाल, तितके जास्त दिवस तुमची जिन्स चांगली टिकते.

९. जिन्सला कधीही पिळू नका. त्यामुळे त्याचे धागे तुटण्याची शक्यता असते.

१०. धुतल्यानंतर जिन्सला कडक उन्हात वाळत घालू नका. त्यामुळे जिन्सचा रंग फिका पडू शकतो.