भयंकर! सिरीयल किलर नर्सने घेतला 300 रुग्णांचा जीव

46

सामना ऑनलाईन । ओल्डनबर्ग

जर्मनीत एका नामांकित रुग्णालयातील पुरुष नर्सने 300 रुग्णांची हत्या केली असून यातील 130 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. नील्स होगन असे या विकृताचे नाव असून तो रुग्णांना चुकीचे इंजेक्शन व औषधे द्यायचा. अशाप्रकारे निरपराध लोकांना ठार करणाऱ्या नील्सचा समावेश जगातील सर्वात क्रूर सिरीयल किलरमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नील्सच्या या कृत्याबद्दल रुग्णालयाला काहीच माहीत नसल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.

43 रुग्णांचा जीव घेतल्याप्रकरणी नील्सला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2002 साली त्याला अटक करण्यात आली. पण हा खटला अद्याप सुरू असून सुनावणीदरम्यान नील्सने न्यायालयासमोर आपण 43 नाही तर शेकडो लोकांचे जीव घेतल्याचा खळबळजनक खुलास केला आहे. त्यानंतर केलेल्या पोलीस तपासात 130 जणांचे मृतदेह सापडले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या