‘लकी’ च्या ट्रेलर लाँचवेळी जीतेंद्र यांचा डान्स

2

सामना प्रतिनिधी । मुंबई

बी लाइव्ह प्रस्तूत लकी चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते जीतेंद्र आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी लकी सिनेमाचा मनोरंजक ट्रेलर दाखवण्यासोबतच सिनेमाचे नुकतेच लाँच झालेले ‘कोपचा’ गाणे ही दाखवण्यात आले. या गाण्यावर जीतेंद्र यांनी डान्सही केला.

डिस्को किंग बप्पी लाहिरींनी कोपचा गाण्याव्दारे मराठीत डेब्यू केला आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा ७ फेब्रुवारीला झळकणार आहे.