‘जीतो उडान’मध्ये दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग

सामना प्रतिनिधी । मुंबई

गोरेगाव पूर्व येथील नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीने (जीतो) आयोजित बिझनेस कॉनक्लेव ऍण्ड ट्रेड अफेअर ‘जीतो उडान’ चे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. या बिझनेस कॉनक्लेवमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून उद्योगपती, प्रतिष्ठत व्यावसायिक, उत्पादक आणि स्टार्टअप करणारे नवे उद्योजक सहभागी झाले होते.

यावेळी जीतो एपेक्सचे चेअरमन प्रदीप राठोड, व्हाईस चेअरमन सुखराज नाहर, प्रेसिडेंट गणपत चौधरी, व्हाईस प्रेसिडेंट विजय भंडारी, मुंबई झोनचे अध्यक्ष हितेश दोशी, प्रमुख सचिव विकी ओसवाल यांच्यासह दहा हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.