जम्मू-कश्मीरमधून 370 आणि 35 (A) हटवण्याची वेळ आली- रैना

91
ravinder-raina-bjp

सामना ऑनलाईन । जम्मू

लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला बहुमत मिळाले असून केंद्रात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये देखील भाजपला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आता जम्मू-कश्मीरमधून 370 आणि 35 (A) हटवण्याची वेळ आली आहे, असे विधान भाजपचे जम्मू-कश्मीर प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी केले आहे.

भाजपने जम्मू आणि लडाखमधील तीन लोकसभा जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे जम्मू-कश्मीरच्या मुद्द्यावर केंद्रात मजबूत पाठबळ मिळाले आहे. त्यानंतर रविंदर रैना म्हणाले आहेत की, संविधानीतील 35 (A) ही संवैधानिक गडबड आणि 370 ही द्वेषाची भिंत आहे तर ही दोन्ही कलमे लवकरच रद्द केली पाहिजेत. या दोन्ही कलमांमुळे या भागातील जनता त्रस्त आहे. जम्मू आणि लडाखच्या जनतेसोबत या कलमांमुळे अन्याय होत असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. तसेच इथल्या जनतेने देखील ही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

कलम 370 आणि 35 ए रद्द करावा ही जम्मू कश्मीरच्या जनतेची इच्छा, भाजपचा दावा

आपली प्रतिक्रिया द्या