लाईव्ह शो दरम्यान महिला प्राध्यापकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

16

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये लाईव्ह शो दरम्यान एका महिला प्राध्यापकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रिता जितेंद्र असे त्यांचे नाव आहे. एका वृत्तवाहिनीवरील लाईव्ह शोमध्ये रिता यांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अँकरबरोबर बोलताना अचानक त्या खाली कोसळल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रिता जितेंद्र या जम्मू-कश्मीर अॅकॅडमी ऑफ आर्ट, संस्कृती आणि भाषा विभागाच्या माजी सचिव होत्या. त्यांच्या अकस्मिक निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. तर रिता यांच्या निधनामुळे आम्हांला जबर मानसिक धक्का बसल्याचं टीव्ही शोच्या निर्मात्या तनवीर मीर यांनी म्हटलं आहे. शो मध्ये रिता चर्चा करत असताना अचानक गप्प झाल्या व खाली कोसळल्या. त्यांना तातडीने स्टाफने रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यामुळे आम्हा सगळ्यांनाच धक्का बसल्याच मीर म्हणाले.

summary- jk-professor-died-in-live-show

आपली प्रतिक्रिया द्या