जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढणाऱ्या जवानांवर दगडफेक

25


सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवांद्याशी लढणाऱ्या जवानांवर स्थानिक लोकांनी दगडफेक केली. यावेळी जवान व दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. तर यात एक जवान जखमी झाला आहे.

येथील रतनीपुरा भागात सकाळपासून जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली होती. यात जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. हे वृत्त पसरताच स्थानिकांचा मोठा जमाव जवांनांवर चालून आला. जमावाने जवानांवर त्यांच्या गाडयांवर जोरदार दगडफेक केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात स्थानिक जवानांवर दगडफेक करत असल्याचे दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या