जेएनयूमध्ये बीफ बिर्यानी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजाराचा दंड

सामना ऑनलाईन । मुंबई

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कॅम्पसमध्ये (जेएनयू) बीफ बिर्यानी शिजवणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दहा हजार रूपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला आहे. या विद्यार्थ्यानी जून महिन्यात विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बिर्यानी शिजवली होती. जेएनयूच्या कुलगुरूंनी मुख्य प्रोक्टर कौशल कुमार यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते मात्र या चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यांनी दंड ठोठावण्यात आला. या दंडासाठी त्यांना १० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

२७ जून रोजी रात्री विद्यापीठातील विद्यार्थी सातापुरा चक्रवर्ती, चेपल शेर्पा, अमीर मलिक, मनीष कुमार यांना विद्यापीठाच्या कुलगुरूं कार्यालयाबाहेर बिर्यानी शिजवली होती. त्या रात्रीच सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकले होते मात्र त्यांनी कुणाचेही ऐकले नव्हते. दुसऱ्या दिवशी या प्रकरणाची रितसर तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले होते. याप्रकणाच्या चौकशीत हे चारही विद्यार्थी दोषी आढळले असून त्यांच्यापैकी सातापुरावर दहा हजाराचा तर इतर तिघांवर सहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.