जॉन अब्राहम करणार मराठी चित्रपट निर्मिती

52

सामना ऑनलाईन । मुंबई

अलिकडच्या काळात मराठी चित्रपटांना सोनेरी दिवस आले आहेत. चाकोरीतून बाहेर पडत मराठी चित्रपट अधिकाधिक आशयघन होताना दिसत आहे. त्यामुळे हिंदीतल्या अनेकांना मराठीची भुरळ पडली आहे. प्रियांका चोप्रा, अजय देवगण, अक्षय कुमार यांच्या यादीत आता जॉन अब्राहमचं नाव सामील झालं आहे. नुकताच त्याने ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाचा मुहूर्त संपन्न केला. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याप्रसंगी सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

या चित्रपटाचं दिग्दर्शन मितवाफेम स्वप्ना वाघमारे-जोशी करणार आहेत. या चित्रपटाची कथा काय आणि कलाकारांची नेमकी भूमिका कशी असेल, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या