जाँटी ऱ्होडसने निवडले 5 सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, हिंदुस्थानी क्रिकेटपटू पहिल्या स्थानी

1

सामना ऑनलाईन, मुंबई

दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होडस हा क्रिकेटविश्वातील सार्वकालीक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानला जातो. क्षेत्ररक्षणासोबतच स्फोटक फलंदाजीची क्षमता असलेल्या जाँटी ऱ्होडस हा जगभरातील क्रिकेटरसिकांच्या गळ्यातील ताईत आहे. आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जाँटीने अनेक सामने फिरवलेले आहेत. अशा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असलेल्या जाँटीला विचारण्यात आलं की त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम क्षेत्ररक्षण कोण तेव्हा त्याने दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे.

जाँटीने क्रिकेटविश्वातील 5 क्षेत्ररक्षकांची नावे घेतली आहे. याबाबतचा एक व्हीडीओ आयसीसीने त्यांच्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केला आहे.

जाँटीच्या यादीमध्ये अँड्र्यू सायमंडस, हर्ष गिब्स, पॉल काँलिंगवूड, एबी डिव्हीलिअर्स आणि सुरेश रैनाचा समावेश आहे. सुरेश रैनाला जाँटीने त्याच्या यादीत पहिले स्थान दिले आहे. जाँटीने तयार केलेल्या यादीतील सगळे क्रिकेटपटू निवृत्त झाले आहेत. या यादीबद्दल ऐकल्यानंतर सुरैश रैनाला प्रचंड आनंद झाला आहे. त्याने ऱ्होडसचे आभार मानले असून जाँटीच माझ्यासाठी क्षेत्ररक्षणातील प्रेरणास्थान असल्याचेही रैना म्हणाला आहे.