पत्रकार प्रशांत कनौजियाची सुटका

59

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याबद्दल अटकेत असणाऱ्या पत्रकार प्रशांत कनौजिया याला सोडून द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. प्रशांतने मुख्यमंत्र्यांबाबत काय ट्वीट केले याला महत्त्व नाही. त्याला कोणत्या कलमाअंतर्गत अटक केली ते सांगा, अशा शब्दांत उत्तर प्रदेश सरकारला ठणकावत सर्वोच्च न्यायालयाने प्रशांतला सोडण्याचे आदेश दिले.

या आदेशानंतर प्रशांतच्या वकिलांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने ही अटकच बेकायदेशीर ठरवली आहे. ही अटक म्हणजे व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या अधिकारात दखल दिल्यासारखे आहे, असेही कोर्टाने पुढे स्पष्ट केले. ही केस हत्येची नाही. अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीला 11 दिवस जेलमध्ये ठेवू शकत नाही, असेही कोर्टाने यूपी सरकारला बजावले. कोर्टाने म्हटले की, आम्ही ट्वीट मंजूर करत नाही, पण प्रशांत कनौजिया याच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे हननही मंजूर करणार नाही, असे न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या