दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूची वर्ल्ड कपनंतर निवृत्तीची घोषणा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्ड कपनंतर अनेक दिग्गज खेळाडू क्रिकेटला रामराम करणार असल्याची शक्यता आहे. आता या लिस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जे.पी. ड्यूमिनीचे नाव समाविष्ट झाले आहे. 2019 वर्ल्ड कपनंतर एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा ड्यूमिनी याने केली आहे.

jp-duminy-pink

आयसीसीने ट्वीट करत जे.पी. ड्यूमिनी वर्ल्ड कपनंतर एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची माहिती दिली. ड्यूमिनेने यााआधी 2017 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असला तरी ड्यूमिनी टी-20 क्रिकेटमध्ये देशासाठी योगदान देताना दिसणार आहे.

निवत्तीबाबत बोलताना ड्यूमिनी म्हणाला की, गेल्या काही महिन्यांमध्ये मला माझ्या कारकीर्दीबाबत आणि भविष्यातील लक्ष्यांचा विचार करण्याची संधी मिळाली. कुटुंबासोबत घालवणे ही प्राथमिकत असल्याने वन डेमधून निवृत्त होत आहे, परंतु टी-20 क्रिकेटसाठी मी उपलब्ध असणार आहे. तसेच ड्यूमिनी पुढे म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळण्याची सधी मिळाल्याने मी मला भाग्यशाली समजतो. सर्व खेळाडू, प्रशिक्षक, मित्र, चाहते आणि कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.

तिसरा विश्वचषक
इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक ड्यूमिनीचा तिसरा विश्वचषक असणार आहे. याआधी त्याने 2011 आणि 2015 मध्ये झालेल्या विश्वचषकात आफ्रिकन संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ड्यूमिनीने आतापर्यंत 193 एक दिवसीय सामन्यात 37.39 च्या सरासरीने 5047 धावांसह गोलंदाजीमध्ये 68 विकेट्स घेतल्या आहेत.