…म्हणून ‘कोहिनूर’साठीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ब्रिटीशांच्या राणीच्या मुकुटात खोवण्यात आलेला ‘कोहिनूर’ हिंदुस्थानला परत मिळावा ही देशातील नागरिकांची इच्छा आहे. मात्र असे असेल तरी सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी करण्यास नकार देत, याचिका फेटाळून लावली. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

‘कोहिनूर’ हिरा हिंदुस्थानला परत मिळावा यासाठी केंद्र सरकार काय पावलं उचलत आहे? यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर केंद्राकडून कोणते पर्याय अवलंबले जात आहे का? याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. त्यामुळे याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालावे, अशा आशयाची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. मात्र कोहिनूर संदर्भात केंद्र सरकारच्या हालचालींवर देखरेख ठेवता येणार नाही. त्यामुळे कोहिनूर संदर्भातील या याचिका दखल पात्र नसल्याचे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.