‘जुडवा -२’ ने दोन दिवसांत कमावले ३६ कोटी

सामना ऑनलाईन | मुंबई

अभिनेता वरुण धवनची दुहेरी भूमिका असलेला ‘जुडवा-२’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करताना दिसत आहे. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने ३६.६५ कोटींची दमदार कमाई केली आहे. पहिल्याच दिवसापासून या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी या सिनेमाने १५.५५ कोटींची तर शनिवारी २०.५५ कोटींची कमाई केली आहे. १९९८ साली रिलीज झालेल्या सलमानच्या ‘जुडवा’ सिनेमाचा हा रिमेक असून डेक्हिड धवन यांनीच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात वरुणसह जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिका आहेत.