‘जुडवा-२’चा ट्रेलर प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई

सलमान खान याच्या सुपरहिट जुडवा या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये धमाल उडवून दिली होती. आता त्याचा सिक्वल जुडवा २ येऊ घातला असून वरूण धवन अभिनित जुडवा २चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सलमान सोबत १९९७ मध्ये करिश्मा कपूर आणि रंभा या दोघी नायिका होत्या. यातही वरुणसोबत तापसी पन्नू आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघी जणी दिसणार आहेत.

हा ट्रेलर निश्चितच सलमानने केलेल्या कामाची आठवण करून देत आहे. विशेष म्हणजे या जुडवामध्येही सलमान कॅमिओ हा डान्स करताना दिसणार आहे. तसंच जुडवामधली टन टनाटन आणि उँची है बिल्डिंग ही गाणी जुडवा-२मध्ये कायम ठेवण्यात आली आहेत.