कश्मीरात शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर दीड तासात दहशतवाद्यांचा हल्ला

प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । श्रीनगर

मुस्लीम धर्मीयांमधील पवित्र अशा रमजान महिन्याच्या काळात जम्मू कश्मीरमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांच्या विरोधात कोणतीही मोहीम राबवण्यात येणार नाही असा निर्णय मोदी सरकारने घेतला. या निर्णयाला दीड तास पूर्ण होत नाही तोच दहशतवाद्यांनी लष्करी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला आहे.

मोदी सरकारचे कश्मीरी दहशतवाद्यांना रमजान गिफ्ट, घेतला धक्कादायक निर्णय!

शोपिया जिल्ह्यातील जामनगरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्त घालणाऱ्या वाहनावर हल्ला केला. ताज्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर लष्करी जवान आणि दहशतवाद्यामध्ये मोठी धुमश्चर्की उडाली आहे. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा दिला असून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे.

दहशतवाद्यांना ‘ईदी’
याआधी बुधवारी जम्मू काश्मिरमध्ये अशांतता पसरवणाऱ्या दहशतवाद्यांना मोदी सरकारने रमजानचे गिफ्ट दिले. मुस्लीम धर्मीयांमधील पवित्र अशा रमजान महिन्याला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या संपूर्ण रमजान महिन्याच्या काळात लष्कराकडून दहशतवाद्यांच्या विरोधात कोणतीही मोहीम राबवण्यात येणार नाही. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी याबबत मोदी सरकारकडे विनंती केली होती. ही विनंती मान्य करत मोदी सरकारने काश्मिरच्या अतिरेक्यांना एक प्रकारे ‘ईदी’ दिल्याचे मानले जात आहे.